www.arundevelopers.com

2014/11/08

पुण्यात गृहप्रकल्पासाठी "अच्छे दिन'


पुण्यात गृहप्रकल्पासाठी "अच्छे दिन' http://epaper1.esakal.com/5Nov2014/Enlarge/PuneCity/page4.htm
पुणे - दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई यांसारख्या महानगरांतील घरे बांधण्याचा वेग कमी होत असताना पुण्यातील गृहबांधणी मात्र चांगलीच वाढली आहे. देशात कोलकत्यातील घरबांधणीचा वेग गतवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक 28 टक्के होता, तर पुण्यात तो दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे अठरा टक्के होता.

कुशमन ऍण्ड वेकफिल्ड या जागतिक स्तरावरील संस्थेने याबाबत पाहणी केली असून दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये अशा प्रकल्पाची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली असल्याचे त्यात आढळून आले. देशामध्ये 166 नवीन गृहप्रकल्प गेल्या तिमाहीत सुरू झाले असले तरीही परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पात मागील वर्षीच्या (जुलै- सप्टेंबर 2013) तुलनेत यंदा 52 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे या पाहणी अहवालात नमूद केले आहे.

कुशमन ऍण्ड वेकफिल्ड ही जागतिक स्तरावर बांधकाम क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करणारी संस्था आहे. या संस्थेतर्फे भारतातील आठ शहरांमध्ये जुलै- सप्टेंबर या तिमाहीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांची पाहणी करण्यात आली. या शहरांमध्ये यंदाच्या तिमाहीत 166 गृहप्रकल्प हाती घेतल्याचे दिसून आले. चेन्नईमध्ये सर्वाधिक 45 प्रकल्प तर अहमदाबादमध्ये सर्वांत कमी म्हणजे पाच प्रकल्पांची पायाभरणी यंदा झाली. या अहवालानुसार, देशातील या शहरांमध्ये मागील वर्षी (जुलै- सप्टें 2013) 43 हजार 800 सदनिकांचे प्रकल्प हाती घेतले होते. त्या तुलनेत यंदा 34 हजार 600 सदनिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यंदा 400 लक्‍झरीस्‌ सदनिकांचे प्रकल्प देशात उभारले जात आहेत. परवडणाऱ्या घरांची संख्या 9 हजार 800 वरुन 4 हजार 700 म्हणजेच 52 टक्‍क्‍यांनी घसरली आहे.